वसुंधरेचे संरक्षक कवच अबाधित ठेवण्याचा संकल्प करा : नरेंद्र तेंडाेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:28+5:302021-09-19T04:32:28+5:30
देवरुख : ओझोन वायू हा वसुंधरेचे संरक्षक कवच असून, ते कवच अबाधित ठेवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा आणि तो संकल्प ...
देवरुख : ओझोन वायू हा वसुंधरेचे संरक्षक कवच असून, ते कवच अबाधित ठेवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा आणि तो संकल्प समाजापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडाेलकर यांनी केले आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस साजरा करण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते.
प्रा. धनंजय दळवी यांनी आपल्या माहितीमध्ये ओझोनचे छत्र अखंडित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कोणत्या गोष्टी कराव्यात व टाळाव्यात तसेच ओझोन थर विरळ झाल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतील, याबाबत आढावा घेतला. निसर्ग मंच प्रमुख प्रा. मयुरेश राणे यांनी मार्गदर्शनात ओझोनबाबत माहिती दिली. ओझोनच्या वातावरणातील पुरेशा प्रमाणामुळे निसर्ग व सजीव सृष्टी यांच्या जीवन साखळीला धोका निर्माण होत नाही. यासाठी ओझोन वायूचे कवच अखंड राहण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथालय विभागातर्फे प्रा. सुभाष मायंगडे यांनी विद्यार्थ्यांसाठी दोन माहितीपट उपलब्ध करून दिले. यामध्ये ‘ओझोन थराचे जतन - जनजागृती’ हा माहितीपट आणि अभ्यास मित्राच्या माहितीपटाव्दारे ओझोन म्हणजे काय?, ओझोनचे कार्य, ओझोनमुळे सजिवांचे होणारे संरक्षण आणि ओझोन थर नष्ट होण्याची कारणे याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग मंच विभाग, प्रसिद्धी विभाग आणि ग्रंथालय विभागातर्फे करण्यात आले होते.
180921\20210918_132721.jpg
विद्यानदिन साजरा