मान दिल्याने पोट नाही भरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:22+5:302021-07-14T04:36:22+5:30

- कंत्राटी परिचारिका, जिल्हा रूग्णालय, रत्नागिरी. कोविड योद्धे म्हणून नुसता गौरव काय कामाचा? आम्हाला वेळ असते, तेव्हा कामावर घ्यायचे. ...

Respect does not fill the stomach | मान दिल्याने पोट नाही भरत

मान दिल्याने पोट नाही भरत

Next

- कंत्राटी परिचारिका, जिल्हा रूग्णालय, रत्नागिरी.

कोविड योद्धे म्हणून नुसता गौरव काय कामाचा? आम्हाला वेळ असते, तेव्हा कामावर घ्यायचे. गरज सरली की काढून टाकायचे, हे शासनाचे धोरण अन्यायकारक आहे. नुसत्या मानाने पोट भरणार आहे का?

- कंत्राटी परिचारिका, महिला रूग्णालय, रत्नागिरी.

कोरोना काळात आम्हाला राबवून घेतले. कोरोना कमी झाल्यावर काहींना कमी केले. त्यापैकी जे अतिदक्षता विभागात काम करत आहेत, त्यांचा विशेष भत्ताच तीन महिने मिळालेला नाही.

- कंत्राटी कक्षसेवक, महिला रूग्णालय, रत्नागिरी.

अनेकांच्या हातातील काम गेले, काहींचे मानधनही थकले

गेल्या मार्च महिन्यात कोरोना सुरू झाला. मे महिन्यात प्रादुर्भाव वाढू लागताच कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक यांची नियुक्ती करण्यात आली. पुन्हा त्यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली गेली. ऑक्टोबर महिन्यात पुन्हा त्यांना कमी केले. काही काम करत आहेत. त्यांचेही मानधन अनियमित होत आहे. काहींचा एप्रिल महिन्यापासूनचा विशेष भत्ता मिळालेला नाही.

Web Title: Respect does not fill the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.