विद्यार्थ्यांमधील आदरयुक्त भीती हेच सरांचे यश : प्रीतम शेट्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:18 AM2021-03-30T04:18:11+5:302021-03-30T04:18:11+5:30

कॅप्शन : शासकीय तांत्रिक विद्यालयातील अध्यापक धुंडिराज जोशी यांच्या सत्कार सोहळ्यासाठी शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ...

Respected fear among students is the success of Sara: Pritam Shetty | विद्यार्थ्यांमधील आदरयुक्त भीती हेच सरांचे यश : प्रीतम शेट्ये

विद्यार्थ्यांमधील आदरयुक्त भीती हेच सरांचे यश : प्रीतम शेट्ये

Next

कॅप्शन : शासकीय तांत्रिक विद्यालयातील अध्यापक धुंडिराज जोशी यांच्या सत्कार सोहळ्यासाठी शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रीतम शेट्ये, राजापूर आयटीआयचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, नाना जोशी, अस्लम पांगारकर, युगंधरा जोशी, वैष्णवी जोशी, वरद जोशी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कडक शिस्त, विद्यार्थी भविष्यात स्वत:च्या पायावर कसा उभा राहील हा दृष्टीकोन ठेवत गेली दोन दशके धुंडिराज जोशी सरांनी विद्यार्थी घडविले. सरांचे अनेक विद्यार्थी आज देशासह परदेशात उच्चस्थानी आहेत. तर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सरांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भीती अद्याप आहे, हे सरांचे यश असल्याचे प्रतिपादन शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रीतम शेट्ये यांनी केले.

शासकीय तांत्रिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात गेली अनेक वर्षे सेवा बजावणारे जोशी दिनांक ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यानिमित्ताने २२ वर्षातील उच्चतम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी शेट्ये बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर आयटीआयचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, नाना जोशी, अस्लम पांगारकर, युगंधरा जोशी, वैष्णवी जोशी, वरद जोशी उपस्थित होते.

गेल्या २२ वर्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्राचार्य शशिकांत कोतवडेकर, ज्योतिषी नाना जोशी यांनी मनाेगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र चव्हाण, सोमनाथ गवस, मंदार गावडे, विवेक कानडे, यश शेट्ये, विश्वास शिंदे, सौरभ कोतवडेकर, महेश कामथेकर, अमोल डोंगरे, प्रीतम वायंगणकर, इब्राहिम नाईक, प्रशांत वेल्हाळ, प्रीतेश पिलणकर, डॉ. महेंद्र गोडसे, वैभव पाडावे, प्रीतम शेरे उपस्थित होते.

Web Title: Respected fear among students is the success of Sara: Pritam Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.