ग्रामीण भागात ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:47+5:302021-06-04T04:24:47+5:30
अडरे : चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचतर्फे हाती घेतलेल्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमाला तालुक्यातील ग्रामीण भागात उस्फूर्त ...
अडरे : चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचतर्फे हाती घेतलेल्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमाला तालुक्यातील ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉ़. हाफिजा परकार दर रविवारी गावात जाऊन ग्रामस्थांची मोफत तपासणी करत आहेत.
तालुक्यात शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी शहराकडे येण्याकरिता गैरसोय होत आहे. त्यामुळे अशा लोकांना गावातच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच संस्थेने पुढाकार घेत ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार एका खासगी बसमधून गावोगावी जाऊन डॉ. हाफिजा परकार या लोकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या संस्थेचे अध्यक्ष अन्वर पेचकर, कार्याध्यक्ष ॲड. ओवेस पेचकर, उपाध्यक्ष सदरुदीन पटेल, शकील परकार, मुशर्रफ पेचकर, मझर पेचकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी या उपक्रमासाठी मेहनत घेत आहेत.
----------------------
चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचतर्फे ‘डाॅक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ग्रामस्थांची तपासणी केली़ जात आहे.