संगमेश्वर गावातील निर्बंध आता शिथील होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:14+5:302021-06-28T04:22:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील नावडी, कसबा, कोंडगाव, माभळे, धामणी या गावांमध्ये कन्टेनमेंट झाेन जाहीर करण्यात आला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील नावडी, कसबा, कोंडगाव, माभळे, धामणी या गावांमध्ये कन्टेनमेंट झाेन जाहीर करण्यात आला आहे. कन्टेनमेंट झाेनमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे संगमेश्वर बाजारपेठेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी कन्टेनमेंट झोनबाबत आपल्या मागण्या मांडल्या. त्यानंतर सामंत यांनी कन्टेनमेंट झोन उठविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यामुळे गावातील निर्बंध शिथील हाेण्याची शक्यता आहे.
चाचणी आणि लसीकरण आदीबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात केली गेल्यामुळे कन्टेनमेंट झोन जाहीर केलेल्या गावांचे विषाणूबाधित क्षेत्र म्हणून निर्बंध उठविण्यात यावेत, अशा प्रशासनाला सूचना केल्या. त्यामुळे लवकरच आदेश प्राप्त होणार आहेत. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी बुरंबी येथील कोरोना विलगीकरण कक्षाला भेट दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यादरम्यान पंचायत समिती सभापती जयसिंग माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी बांधकाम सभापती महेश म्हाप, प्रांताधिकारी जयदीप सूर्यवंशी, नावडी उपसरपंच विवेक शेरे, मंदार खातू, संजय कदम, संदीप रहाटे आणि व्यापारी उपस्थित होते.