कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:09+5:302021-08-20T04:36:09+5:30
रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रांतिकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे ...
रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रांतिकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस मिळाले. प्रथम क्रमांक भार्गवी विवेक केळकर, द्वितीय क्रमांक अर्थ आनंद पारखी, तृतीय क्रमांक मनवा ऋषिकेश जोशी यांनी यश मिळवले.
स्पर्धेचे परीक्षण मीरा भिडे, अर्चना फाटक यांनी केले. संस्कार वर्गाचे नियोजन सुनेत्रा जोशी व विशाखा सोमण करत आहेत. स्पर्धेचा निकाल असा- सर्वोत्कृष्ट- अर्णव पटवर्धन (परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिर, रत्नागिरी), प्रथम- भार्गवी केळकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी), द्वितीय- अर्थ पारखी (सें. माँटफोर्ट स्कूल, भोपाळ), तृतीय- मनवा जोशी (एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी), उत्तेजनार्थ- वैष्णवी भागवत (युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण), आरिषा यदमळ (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड), निधेय ढोले (सेंट थॉमस स्कूल, रत्नागिरी), वेद गोगटे (मो. गोगटे विद्यालय, जामसंडे, सिंधुदुर्ग). कौतुकास्पद- प्रिशा यदमळ (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड), श्रीराम देव (किडझी प्री स्कूल), राघव पटवर्धन (दामले विद्यालय, रत्नागिरी).