सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्यापाऱ्यांनी केली दमदाटी

By admin | Published: March 10, 2015 09:45 PM2015-03-10T21:45:28+5:302015-03-11T00:15:09+5:30

या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

The retired officer has done business with the manipulator | सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्यापाऱ्यांनी केली दमदाटी

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्यापाऱ्यांनी केली दमदाटी

Next

रत्नागिरी : मालवाहू ट्रक हलवण्यास सांगितल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना चिपळूण येथील व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याच्या घटनेप्रमाणेच येथील मारूती मंदिर भागातही एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला काही दिवसांपूर्वी असाच अनुभव आल्याचे पुढे आले आहे. अरेरावीचे प्रकार आता अनेकांच्या बाबतीतही घडू लागल्याने यावर वेळीच आळा घालण्याची मागणी होऊ लागली आहे.काही दिवसांपूर्वीच येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अध्$ि$िकारी डॉ. शशांक पाटील यांनी मारूती मंदिर येथील पोस्टाच्या कार्यालयात काम असल्याने आपली चारचाकी गाडी डाव्या बाजूला व्यवस्थित लावून ठेवली होती. त्याचवेळी तेथील व्यापाऱ्याचा एक ट्रक तिथे आला. ट्रकचालकाने अरेरावीच्या भाषेतच डॉ. पाटील यांना गाडी पुढे घेण्यास सांगितली. त्याचवेळी दुसरी एक व्यक्ती हातात कागदपत्रे घेऊन आली. कागदपत्रे पाहिल्याने पाटील यांना तो आर. टी. ओ. कार्यालयातील असल्याचे वाटले. त्यांनी तशी विचारणा करताच ती व्यक्ती एकदम भडकली आणि डॉ. यांचे शिक्षण, अक्कल काढण्यास सुरूवात केली. त्याचवेळी बाजूचे व्यापारी आले आणि त्यांनी एकत्रितपणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने पाटील हबकूनच गेले. या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The retired officer has done business with the manipulator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.