राजापुरात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:13+5:302021-07-30T04:33:13+5:30
राजापूर : तालुक्यात पुरामुळे झालेले नुकसान आणि कोरोनाबाबत माहिती घेण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे राजापूर ...
राजापूर : तालुक्यात पुरामुळे झालेले नुकसान आणि कोरोनाबाबत माहिती घेण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यात भातशेती तसेच पूल, रस्ते व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानभरपाई पंचनाम्यांचा आढावा तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्याचे आदेश या बैठकीमध्ये आमदार साळवी यांनी दिले. जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी पालकमंत्र्यांच्या बैठकीत प्रयत्न करणार असल्याचे साळवी यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नगर परिषद मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी निखिल परांजपे, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, सभापती उन्नती वाघरे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता आकाश मापके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. आर. उरणकर, आर. ए. पाटील, एस. वाय. भालेकर, महावितरणचे अनिल डोंगरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. पाटील, आरोग्यसेवक आर. ए. यादव, एस. व्ही. बंडगर, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, नगर परिषद गटनेता विनय गुरव, विभागप्रमुख नरेश दुधवडकर, नामदेव मयेकर उपस्थित होते.