शिक्षक पतपेढीतर्फे मुलांसाठी बक्षीस योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:19+5:302021-09-08T04:37:19+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे सभासदांचे पाल्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे सभासदांचे पाल्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी व बारावी, एमटीएस, एनटीएस, केटीएस तसेच नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येत आहे.
सभासदांच्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी परीक्षेत ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण बारावी परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण, प्रज्ञाशोध, एमटीएस, एनटीएस, केटीएस तसेच नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. एखाद्या सभासदांचे बक्षीस योजनेसाठी पात्र होणारे एकापेक्षा अधिक पाल्य असल्यास प्रत्येक पाल्यासाठी स्वतंत्र अर्ज पूर्ण कागदावर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.