सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावे रिक्षा परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:56+5:302021-07-19T04:20:56+5:30

राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने नियमाप्रमाणे कायद्याने बेरोजगार व्यक्तीनेच घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, माहिती ...

Rickshaw licenses in the name of government employees | सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावे रिक्षा परवाने

सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावे रिक्षा परवाने

Next

राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने नियमाप्रमाणे कायद्याने बेरोजगार व्यक्तीनेच घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, माहिती लपवून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन राज्य-केंद्र शासनाच्या नोकरदारांनी हे परवाने घेतल्याने त्याचा फटका गरजू रिक्षाचालकांना बसला आहे.

कुटुंबीयांचा स्थलांतराला नकार

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप मानेवाडीत जमीन खचण्याचा प्रकार झाल्याने एका घराला धोका निर्माण झाला आहे. या घरात वास्तव्याला असलेल्या तीन कुटुंबांमधील १५ सदस्यांनी स्थलांतराला नकार दिला आहे. त्यांना प्रशासनाने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या.

इमारतीची पडझड

राजापूर : तालुक्यात गेले काही दिवस पावसाने घातलेल्या थैमानाने ओढवलेली पूरस्थिती आटोक्यात येत असतानाच पडझडीच्या घटना सुरुच आहेत. जैतापूर बाजारपेठेत असलेल्या बीएसएनएलच्या दूरध्वनी केंद्राच्या इमारतीचा काही भाग ढासळून पडला आहे.

भातशेती पाण्याखाली

गणपतीपुळे : संततधार पावसामुळे गणपतीपुळे पंचक्रोशीच्या बहुतांश गावांमधील भातशेती पाण्याखाली गेली आहे. लावणीनंतर पावसाचा जोर वाढल्याने साचलेल्या पाण्यामुळे भाताची रोपे कुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सलग चार दिवस पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लांजा नगर पंचायत आग्रही

लांजा : तत्कालीन जिल्हाधिकारी यांची बदली होताच लांजा नगर पंचायतीमधील सत्ताधारी शिवसेनेने ग्रामस्थांचा विरोध डावलून कोत्रेवाडीतच डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प उभारण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरु केल्या आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पाला अंशत: स्थगिती दिली होती.

Web Title: Rickshaw licenses in the name of government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.