दोन घरांवर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:35 PM2017-08-28T23:35:24+5:302017-08-28T23:35:24+5:30

The rift in two houses collapsed | दोन घरांवर दरड कोसळली

दोन घरांवर दरड कोसळली

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
देवगड : देवगड तालुक्यात मुसळधार पावसामुळे सडेवाघोटण येथील वानिवडेकर कुटुंबीयांच्या दोन घरांवर दरड कोसळून सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी रात्री १२.३०च्या सुमारास घडली. घरांतील २५ माणसे या दुर्घटनेतून बचावली.
रात्री भजन आटोपून घरी आलेल्या माणसांच्या निदर्शनास आल्याने तसेच दरडीचे मोठे दगड प्रथम घरालगत असलेल्या माडावर कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सडेवाघोटण येथे दिनकर सीताराम वानिवडेकर कुटुंबीयांची दोन घरे असून, रविवारी रात्री १२.३० वाजता दोन्ही घरांवर दरड कोसळली. एका घरामध्ये चार बिºहाडे राहत असून, दरड कोसळलेल्या ठिकाणी असलेल्या दोन खोल्यांमध्ये दत्ताराम वानिवडेकर व सुनील धाकू वानिवडेकर यांचे कुटुंब राहत होते. दुर्घटना घडली त्यावेळी दत्ताराम यांच्या खोलीत सहाजण व सुनील यांच्या खोलीत पाचजण झोपले होते. तर गणपती असलेल्या हॉलमध्ये दिनकर सीताराम वानिवडेकर व लक्ष्मी दिनकर वानिवडेकर हे होते. तर उर्वरित दोन खोल्यांमध्ये दहा माणसे झोपली होती.
या घरालगत असलेल्या दुसºया घरात मनोहर दिनकर वानिवडेकर (४२), मोहिनी मनोहर वानिवडेकर (३५), धनिष्ठा मनोहर वानिवडेकर (१६) व मितेश मनोहर वानिवडेकर (१५) हे कुटुंबीय झोपले होते.
रविवारी रात्री गणेशोत्सवानिमित्त वाडीत असलेले भजन आटोपून घरी आलेल्या माणसांच्या लहान लहान दगड घरावर पडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रथम दोन्ही घरांत झोपलेल्या माणसांना सावध करून घराबाहेर काढले व काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

Web Title: The rift in two houses collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.