उष्मा वाढण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:46+5:302021-04-21T04:31:46+5:30

ग्राहकांची गैरसोय दापोली : तालुक्यात कोरोनामुळे कडक शासकीय निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजी विक्री सध्या बंद असून, ...

Risk of heat buildup | उष्मा वाढण्याचा धोका

उष्मा वाढण्याचा धोका

Next

ग्राहकांची गैरसोय

दापोली : तालुक्यात कोरोनामुळे कडक शासकीय निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजी विक्री सध्या बंद असून, भाजी उपलब्ध होणार नसल्याने ३० एप्रिलपर्यंत भाज्यांची उपलब्धता कशी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांची मात्र गैरसोय होत आहे.

कूलरचे लोकार्पण

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी बुद्रुक येथील मधलीवाडी ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून थंड व स्वच्छ पाणी सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी कूलर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सरपंच विकास सुर्वे, उपसरपंच अनिल सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते विकास सुर्वे आदी मान्यवरांच्या हस्ते कूलरचे लोकार्पण करण्यात आले.

रुग्णांची गैरसोय

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रायपाटण येथे कोविड सेंटर सुरू झाले आहे. शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर रुग्णालय आहे.

प्रश्नांकडे दुर्लक्ष

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील पश्चिम हसरेवाडी (कातकरवाडी) रस्ता खणून जागा मालकाने मज्जाव केला आहे. या प्रश्नी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यासाठी मागणी केली आहे; मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

निसर्ग सुर्वेची निवड

खेड : तालुका कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद सुर्वे यांचे चिरंजीव निसर्ग सुर्वे याने एनएनए परीक्षेत ऑल इंडिया रँक २२८ गुण मिळवत यश संपादन केले आहे. एनडीए एअरफोर्समध्ये त्याची निवड झाली आहे. पुणे येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे तो देशसेवेत लवकरच रुजू होणार आहे.

ऊरूस रद्द

खेड : तालुक्यातील कसबा शास्तीपूल येथील हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेला हजरत जंगलपीर शहा बाबांचा ऊरूस १५ मे रोजी होणार आहे; मात्र कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून ऊरूसनिमित्त केवळ धार्मिक कार्यक्रम मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. अन्य कार्यक्रम होणार नाहीत.

ऑनलाइन गजर गायन स्पर्धा

रत्नागिरी : आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ आयोजित कै. आत्माराम विष्णू अळवणी यांचे स्मरणार्थ अळवणी कुटुंबीय सावंतवाडी पुरस्कृत कोकण विभागीय ऑनलाइन गजर गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.

अनुदानापासून वंचित

देवरूख : महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित तत्त्वावरील, अंशत: अनुदान तत्त्वावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान देण्यात येते; मात्र कोल्हापूर व मुंबई विभागातील अनुदानास पात्र घोषित केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना सापत्नपणाची वागणूक दिली आहे. दोन्ही विभागातील कनिष्ठ महाविद्यालये अनुदानापासून वंचित राहिली आहेत.

वेदिका पाचकलेचे यश

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. बी. शिर्के प्रशालेंतर्गत कार्यरत असलेल्या गुरुकुलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी वेदिका नथुराम पाचकले हिने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक पटाविला आहे. बॅटरीवर चालणारी औषध फवारणी, गाडी धुण्याचे यंत्र असा प्रकल्प सादर केला होता.

Web Title: Risk of heat buildup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.