चिपळूण पंचायत समिती सभापतिपदी रिया कांबळे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:52+5:302021-04-02T04:32:52+5:30

चिपळूण पंचायत समितीच्या सभापतिपदी रिया कांबळे यांची बिनविराेध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ...

Riya Kamble unopposed as Chiplun Panchayat Samiti chairperson | चिपळूण पंचायत समिती सभापतिपदी रिया कांबळे बिनविरोध

चिपळूण पंचायत समिती सभापतिपदी रिया कांबळे बिनविरोध

Next

चिपळूण पंचायत समितीच्या सभापतिपदी रिया कांबळे यांची बिनविराेध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : येथील पंचायत समिती सभापतिपदी रिया कांबळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतिपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली. यानंतर हा पॅटर्न राज्यात अन्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून राबविण्यात येऊ लागला. यानुसार गेल्या सव्वा वर्षापूर्वी येथील पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत तो राबविण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या येथील नेत्यांच्या बैठकीत सव्वा वर्षे सेनेचा, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला संधी देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार या पदासाठी सव्वा वर्षापूर्वी सभापतिपदी शिवसेनेच्या धनश्री शिंदे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पांडुरंग माळी यांची वर्णी लावण्यात आली. हा सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर धनश्री शिंदे यांनी आपल्या सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर यापदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या पदासाठी सदस्या रिया कांबळे यांच्यासह समीक्षा घडशी यांचे नाव पुढे आले होते.

दाेनजण इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सभापतिपदासाठी रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण पवार यांनी काम पाहिले.

या निवडीनंतर आ. शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंत खताते, माजी सभापती शौकत मुकादम, पूजा निकम, इब्राहिम दलवाई, पांडुरंग माळी, सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, राजू जाधव, विकास गमरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Riya Kamble unopposed as Chiplun Panchayat Samiti chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.