अडरे आरोग्य केंद्राला सभापती रिया कांबळे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:44+5:302021-04-29T04:23:44+5:30
अडरे : पंचक्रोशीतून येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्व ग्रामस्थ मंडळींना आरोग्य केंद्राकडून चांगल्या सेवा-सुविधा द्या. कोरोनाविषयी जनजागृती करा. शासनाच्या सर्व ...
अडरे : पंचक्रोशीतून येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्व ग्रामस्थ मंडळींना आरोग्य केंद्राकडून चांगल्या सेवा-सुविधा द्या. कोरोनाविषयी जनजागृती करा. शासनाच्या सर्व आरोग्यदायी योजना सर्वत्र पोहोचल्या पाहिजेत. सभापती म्हणून जेथे-जेथे आपली गरज लागेल, तिथे मी आपल्यासोबत आहे, असे आश्वासन सभापती रिया कांबळे यांनी अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.
सभापती रिया कांबळे यांनी मंगळवारी अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होमक्वारंटाइन असणाऱ्या रुग्णांवर चांगले प्राथमिक उपचार केले जात असून, लसीकरण मोहीमही योग्य राबविली जात आहे. याबद्दल त्यांनी येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवा क्षेत्र असलेल्या पंचक्रोशीत १७ गावे असून, एकूण ४८ हजार लोकसंख्या येथे आहे. आरोग्य केंद्रामार्फत एकूण ४० आरोग्यसेविका कार्यरत आहेत. यावेळी डॉ.राधा मोरे, आरोग्यसेविका अस्मिता सावंत, नीलेश कदम, आरोग्यसेवक विनोद जाधव, सुपरवायझर राजेश जाधव, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, माजी सरपंच विजय सुर्वे, माजी सरपंच मानसी पवार, प्रमोद पवार, विनोद कांबळे, संदेश पवार, अशोक कांबळे, प्रदीप पवार, विनोद कांबळे आदी उपस्थित होते.