रियाज अकबर अली आता आंतरराष्ट्र स्तरावर

By admin | Published: July 22, 2014 10:47 PM2014-07-22T22:47:01+5:302014-07-22T22:48:49+5:30

स्पर्धेत जगातील २० देशांचे स्पर्धक सहभागी होणार

Riyaz Akbar Ali now at international level | रियाज अकबर अली आता आंतरराष्ट्र स्तरावर

रियाज अकबर अली आता आंतरराष्ट्र स्तरावर

Next

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील रियाज अकबर अली यांची मालदीव येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत जगातील २० देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारताचे चार खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यामध्ये रियाज अकबर अली याचा समावेश आहे.
मार्चमध्ये २१व्या वाराणसी येथे झालेल्या आॅल इंडिया कॅरम फेडरेशन कप स्पर्धेत थ्री ब्रेक टू फिनीश विजेतेपद पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात रियाज यांनी मानाचा तुरा रोवला होता. त्यांनी आतापर्यंत ५७ जिल्हास्तरीय एकेरी स्पर्धा तर सहा वेळा मुंबई चॅम्पियनशीप जिंकली आहे. २०१० ते २०१२ मध्ये सलग तीन वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. राज्य अजिांक्यपद स्पर्धा तीनवेळा जिंकली. नांदेड व जळगाव येथे पाठोपाठ झालेल्या स्पर्धेत रियाज अली यांनी २००७मध्ये चॅम्पियनशीप मिळविली. पंधराव्या इंटरइन्स्टिट्यूट कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत उपविजेतेपद, तर जानेवारी २०१४मध्ये मुरादाबाद येथे झालेल्या इंटरझोनल स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच मार्चमध्ये झालेल्या ४३व्या सिनिअर नॅशनल कॅरम चॅम्पियन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत रियाज यांना भारताकडून खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महंमद गुफरान, के. श्रीनिवासन, व्ही. आकाश या भारतीय खेळाडूंबरोबर रियाज यांना खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी रियाज अकबरअली यांच्या खेळातील गुण हेरून ‘एअर इंडिया’ कंपनीने करारबध्द केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Riyaz Akbar Ali now at international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.