रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:37 AM2021-08-17T04:37:09+5:302021-08-17T04:37:09+5:30

गुहागर : तालुक्यातील आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुहागर-आबलोली मार्गे आवरे, असोरे, शिवणे, कोडवली, भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून ...

Road condition | रस्त्याची दुरवस्था

रस्त्याची दुरवस्था

Next

गुहागर : तालुक्यातील आवरे-भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुहागर-आबलोली मार्गे आवरे, असोरे, शिवणे, कोडवली, भातगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. डांबरीकरण उखडले असून, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शिवाय साईडपट्टी निकामी झाली आहे.

आरिफा मोनये यांची निवड

राजापूर : तालुक्यातील कोतापूर ग्रामपंचायतीच्या व सरपंचपदी शिवसेनेच्या आरिफा मोनये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपसरपंच प्रमोद जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर मोनये यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, संतोष हातणकर उपस्थित होते.

आज निवड चाचणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन १६ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे निवड चाचणी होणार आहे. सकाळी ७.३० वाजता मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दीपक देसाई यांनी केले आहे.

मोफत नेत्र तपासणी

रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ, गोळप यांच्यातर्फे लायन्स आय हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या सौजन्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पाटणकर कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे.

इंटरनेट समस्या मार्गी

राजापूर : नेटवर्कअभावी ग्रामपंचायतीच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी कुवेशी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मनोहर कांबळी यांनी स्वखर्चाने नेटवर्क बुस्टर बसवून इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून घेतली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कौशल्य स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर १७ व १८ ऑगस्ट रोजी कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विभाग राज्य व देशपातळीवर उमेदवारांची निवड करून जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहे.

ग्रामसेवकांच्या बदल्या

रत्नागिरी : तालुक्यातील आठ ग्रामसेवक व दोन ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चांदोर, शिवार आंबेरे, चाफेरी, खानू, काळबादेवी, सैतवडे, जांभारी, पोमेंडी खुर्द येथील ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. पावस येथून ग्रामविकास अधिकारी आंबेरे यांची बदली रत्नागिरीत तर कुवारबाव येथून गुरव यांची बदली पावस येथे झाली आहे.

Web Title: Road condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.