रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:19+5:302021-09-27T04:34:19+5:30
श्वानांचा उपद्रव खेड : शहरातील बहुतांश एटीएम मशीनच्या केबीनचे दरवाजे ग्राहकांकडून खुले ठेवण्यात येतात. शिवाय सुरक्षारक्षक परिसरात नसल्यामुळे एटीएम ...
श्वानांचा उपद्रव
खेड : शहरातील बहुतांश एटीएम मशीनच्या केबीनचे दरवाजे ग्राहकांकडून खुले ठेवण्यात येतात. शिवाय सुरक्षारक्षक परिसरात नसल्यामुळे एटीएम मशीनच्या केबीनमध्ये श्वानांचा उपद्रव वाढला आहे. भीतीमुळे ग्राहकांना एटीएममध्ये जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजित बेलवलकर यांची निवड
गुहागर : तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्षपदी अजित बेलवलकर यांची निवड करण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन बेलवलकर यांचा सत्कार करण्यात आला. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बेलवलकर यांची ओळख आहे.
एनएसएस सप्ताह
राजापूर : तालुक्यातील पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे एनएसएस सप्ताह साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. प्राचार्य डाॅ. पी. एस. मेश्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सुसज्ज मार्केट सुरू
रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा येथे मासळी विक्रेत्यांसाठी सुसज्ज मार्केटची इमारत बांधण्यात आली असून, त्याठिकाणी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. ग्रामस्थांमधून या उपक्रमाचे काैतुक करण्यात येत आहे.