बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:04 PM2019-06-20T14:04:39+5:302019-06-20T14:06:18+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.

The roadmap for tourists' safety on the coast from Bankot-Rajapur will be approved | बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार

बाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणार

googlenewsNext
ठळक मुद्देबाणकोट-राजापूरपर्यंत किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी आराखडा मंजूर होणारनिरंजन डावखरे यांच्या तारांकित प्रश्नावर पंकजा मुंडेंची माहिती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.
 
जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूरदरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भातील आराखडा प्रलंबित होता. त्यावरुन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज तारांकित प्रश्व विचारला होता. त्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तर दिले. कोकण ग्रामीण पर्यटन विकास समितीच्या आगामी बैठकीत पर्यटक सुरक्षा आराखड्याबाबत प्रस्ताव सादर केला जाईल. या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून 650 लाईफ जॅकेट खरेदी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून समुद्रकिनाऱ्यावर वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत, असे मंत्री मुंडे यांनी नमूद केले. 

रत्नागिरी विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक : डावखरे

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याचा सुमारे 700 ते 800 कोटींचा विकास आराखडा प्रलंबित आहे. या आराखड्याच्या मंजूरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करून आराखडा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Web Title: The roadmap for tourists' safety on the coast from Bankot-Rajapur will be approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.