पाचल भागात रस्ते, मोऱ्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:36+5:302021-07-14T04:36:36+5:30

पाचल : गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाचल परिसराला झोडपून काढले आहे. तळवडे-पाचल येथील अर्जुना नदीला मोठा पूर ...

Roads in Pachal area, under water | पाचल भागात रस्ते, मोऱ्या पाण्याखाली

पाचल भागात रस्ते, मोऱ्या पाण्याखाली

googlenewsNext

पाचल : गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाचल परिसराला झोडपून काढले आहे. तळवडे-पाचल येथील अर्जुना नदीला मोठा पूर आला असून, परिसरातील मोऱ्या व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत.

पाचल परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाचल-नारकरवाडी येथील मोरी पाण्याखाली गेली असल्याने येथील रह­दारी व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अर्जुना धरणाचा सुमारे एक किलाेमीटर लांबीचा उजवा कालवा वाहून गेला आहे. कालव्याचे पाणी व माती शेतकऱ्यांच्या शेतात पसरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाचल-जवळेथर रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. नदीकाठावरची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाचल बाजारपेठेत नाल्याचे पाणी दुकानांत शिरल्याने काही व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही.

Web Title: Roads in Pachal area, under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.