मिमिक्रीमध्ये रोहन करकरे याला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:17+5:302021-04-06T04:30:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : येथील दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन करकरे याने मुंबई विद्यापीठाच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : येथील दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन करकरे याने मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवामध्ये मिमिक्री या कला प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
महाविद्यालयाला उत्तर रत्नागिरी विभागात प्राप्त झालेल्या पारितोषिकांमध्ये सुगम संगीत प्रकारात तन्वी गुरव, मिमिक्रीमध्ये रोहन करकरे, कार्टूनिंगमध्ये मुस्कान चिपळूणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कथाकथन स्पर्धेत रुख्सार ममतुले, शास्त्रीय संगीत प्रकारात ऋतुजा ओक, ऑन द स्पॉट पेंटिंग प्रकारात अनघा जोशी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. सर्व स्पर्धकांना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रियांका साळवी, सदस्य प्रा. विश्वेश जोशी, प्रा. प्रिया करमरकर प्रा. मुग्धा कर्वे, प्रा. श्रुती आवळे, प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. संतोष मराठे, प्रा. कैलास गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धकांच्या यशस्वी सहभागासाठी प्रा. शंतनू कदम, प्रा. सदानंद डोंगरे, प्रा. स्वप्नील साळवी यांनी तांत्रिक साहाय्य केले.