बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:48+5:302021-04-13T17:37:19+5:30

Ratnagiri Nilesh Rane: काजू व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खा. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती व अधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत बाजार समितीने काजू कारखानदार व व्यावसायिकांशी सहकार्याची भूमिका घेतली आहे.

The role of cooperation from market committee to cashew traders | बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका

बाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देबाजार समितीकडून काजू व्यावसायिकांना सहकार्याची भूमिका नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झाली बैठक

रत्नागिरी : काजू व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खा. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती व अधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत बाजार समितीने काजू कारखानदार व व्यावसायिकांशी सहकार्याची भूमिका घेतली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून परजिल्ह्यातील बाजार समितीकडून जाचक कर वसुली होत असल्याची तक्रार काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांनी केली होती. त्यावर रत्नागिरी बाजार समितीचे सभापती संजय आयरे यांनी माजी खा. नीलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी काजू व्यावसायिक व प्रक्रिया उद्योजकही उपस्थित होते.

व्यावसायिक आणि उद्योजकांनी बाजार समितीकडून दोन वेळा घेतला जाणारा सेस, वेअरहाऊसची उपलब्धता, ग्रेडिंग आणि पिलिंग प्लांट आदी सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यावसायिक व प्रक्रियादारांनी केली. यावर माजी खा. यांनी सभापती संजय आयरे यांना काजू व्यावसायिक आणि प्रक्रिया उद्योजकांना सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रश्न प्राधान्याने सोडवावे, अशी सूचना केली. यावर बाजार समितीचे सभापती संजय आयरे यांनी नीलेश राणे यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन दिले.

यावेळी काजू प्रक्रिया उद्योग संघटनेचे अध्यक्ष बारगीर, काजू उद्योजक रविकिरण करंदीकर, संदेश दळवी, ऋषिकेश परांजपे तसेच बाजार समितीचे सचिव प्रमोद मोहिते, लिपिक मंदार सनगरे, नाके सहायक आशिष वाडकर उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी खंडित झालेली तारण कर्ज सुविधा, सबसिडी आशा आदी विषयांवर नीलेश राणे यांच्या सोबत चर्चा केली. हे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे नीलेश राणे यांनी सांगितले.

Web Title: The role of cooperation from market committee to cashew traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.