विमानतळासाठी ३५0 कोटींचा निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:05 PM2018-04-01T23:05:03+5:302018-04-01T23:05:03+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी ‘टाईम बाऊंड’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्याबरोबरच विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विमानतळाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रत्नागिरीत रविवारी राऊंड टेबल परिषद घेण्यात आली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. संपूर्ण देशातील जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासानंतर राज्य व देश विकसित करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विकास आराखडे तयार केले जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही समावेश आहे.
जिल्ह्यांच्या विकास आराखड्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला आहे. विविध शासकीय माध्यमांतून दोन्ही जिल्ह्यांचा सर्व्हे यापूर्वीच करण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा तयार केला असून, आजपासून अंमलबजावणीला प्रारंभ होणार असल्याचे मंत्री प्रभू यांनी सांगितले.विविध शासकीय योजना जनमानसापर्यंत पोहोचवत असताना काही सामाजिक संस्था त्यामध्ये आपला महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे या माध्यमातून कार्यरत आहे. संस्थेतर्फे नर्सिंग कॉलेज सुरू असून, याठिकाणी शिक्षण घेतलेल्या महिला आज नामवंत रुग्णालयांसह परदेशातील रुग्णालयातही कार्यरत आहेत. युपीन फाउंडेशनसारखी संस्था शेतीसाठी कार्यरत आहे. सरकारला जनतेचे प्रश्न समजले पाहिजेत व जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळाली पाहिजे, यासाठी कार्यरत असणाºया महिलांना इलेक्ट्रिकल ५०० सायकलींचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चार महिन्यांत रत्नागिरी, सिंधुदुर्गातून विमानसेवा
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. याची तारीख मी आता घोषित करीत नाही. यासाठी दिल्लीत बैठक झाली असून, मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे; परंतु चार महिन्यांच्या कालावधीत विमानसेवा निश्चितच सुरू होईल,