पाऊस थांबण्यासाठी धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:59+5:302021-07-23T04:19:59+5:30
राजापूर : गेल्या १० ते ११ दिवसांपासून पावसाचा उसंत न घेता सुरु असलेला रौद्रावतार पाहता अर्जुना, कोदवली नद्यांसह शुक ...
राजापूर : गेल्या १० ते ११ दिवसांपासून पावसाचा उसंत न घेता सुरु असलेला रौद्रावतार पाहता अर्जुना, कोदवली नद्यांसह शुक नदीच्या पूरपरिस्थितीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांच्या काठासह खाडीपट्ट्यातील भातशेती सातत्याने पाण्याखाली जात असल्याने नुकसान झाले आहे.
रुग्णवाहिका मिळणार
चिपळूण : आमदार शेखर निकम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राला गुरुवारी रुग्णवाहिका मिळणार होती. त्यासाठी पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
पालगड येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
दापोली : जनतेप्रति सामाजिक बांधिलकीची अंगी तळमळ असावी लागते, असे प्रतिपादन युवा सेना राज्य कार्यकारिणी कोअर कमिटी सदस्य आणि शिवतेज आरेाग्य संस्था, खेडचे सिध्देश कदम यांनी पालगड येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
बिल वितरणात अनियमितता
खेड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला कोकणात स्पर्धकच नसल्यामुळे ही कंपनी स्वत:ची मनमानी व मक्तेदारी वापरुन ग्राहकांची बेसुमार लूट करते की काय? हेच आलेल्या वाढीव वीजबिलांतून दिसून येत आहे.
मुलींना धनादेशाचे वाटप
गुहागर : एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना, गुहागर पंचायत समितीच्यावतीने ‘माझी कन्या भाग्यश्री लाभार्थी’ अंतर्गत मुलींना २५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. गुहागर पंचायत समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.