एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:06 AM2019-02-25T00:06:47+5:302019-02-25T00:06:52+5:30
दापोली : एस. टी.चे कर्मचारी जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु या कर्मचाºयांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करित ...
दापोली : एस. टी.चे कर्मचारी जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु या कर्मचाºयांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करित आहे. कामगार संघटनेच्या सहनशिलतेचा अंत सरकारने पाहू नये असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दापोली येथे बोलताना केला. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या दापोलीत आयोजित केलेल्या ५५व्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी पवार बोलत होते. राज्यभरातील २० हजार एस. टी. कर्मचारी या अधिवेशनासाठी दापोलीत आले आहेत.
या अधिवेशनात बोलताना पवार पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. एस. टी. कर्मचाºयांचे प्रश्न असो वा कामगारांचे प्रश्न या शासनाने आश्वासनांपलिकडे काहीही केले नाही. त्यामुळे समाजात जाऊन काम करणाºया अशा कर्मचाºयांमध्ये शासनाविषयी मोठा असंतोष आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे आपला पाठपुरावा सुरु आहे. मात्र, कामगार संघटनेच्या सहनश्लितेचा अंत सरकारने पाहू नये.
यावेळी एस. टी. कामगार संघटनेचे सहसचिव हनुमंत ताटे म्हणाले की, एस. टी. महामंडळ हे शासनाचे आहे. मात्र आमच्या कर्मचाºयांना राज्य शासनाचे कर्मचारी असा दर्जा नाही, सातवा वेतन आयोग नाही. ३२ ते ४८ टक्के वेतनावाढ देण्याची घोषणा करूनही शासनाने ती अद्याप दिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.या अधिवेशनाला माजी मंत्री सुनील तटकरे, दापोलीचे आमदार संजय कदम, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे संदीप शिंदे उपस्थित होते.