एस. टी. बंदमुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:07+5:302021-03-25T04:29:07+5:30

देवरुख : येथील आगाराची करजुवे - चिपळूण ही सकाळी ८.१५ वाजता सुटणारी गाडी बंद केल्यामुळे खाडी भागातील लोकांची गैरसोय ...

S. T. Inconvenience due to closure | एस. टी. बंदमुळे गैरसोय

एस. टी. बंदमुळे गैरसोय

Next

देवरुख : येथील आगाराची करजुवे - चिपळूण ही सकाळी ८.१५ वाजता सुटणारी गाडी बंद केल्यामुळे खाडी भागातील लोकांची गैरसोय होत आहे. या भागातील अनेक रुग्ण या गाडीवर अवलंबून असतात. चांगले भारमान असूनही ही गाडी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विविध कार्यक्रम

गुहागर : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला १९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त तालुक्यातील अपंगांच्या विविध समस्या सोडविणाऱ्या या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त २५ रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. संस्थेच्या कार्यालयात कोरोना अनुषंगाने नियमांचे पालन करुन हे कार्यक्रम होणार आहेत.

कौशल्य विकास प्रमाणपत्र

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य व्यवसाय कौशल्य विकास मंडळ, मुंबई यांच्यामार्फत सहामाही, एक वर्ष, दोन वर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी ३१ मार्चकडून अर्ज दाखल करण्याचा कालावधी विलंब शुल्कासह दिनांक १ ते १५ एप्रिलपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा.

शिवगान स्पर्धा

सावर्डे : भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे नुकत्याच शिवगान स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत १० स्पर्धकांनी वैयक्तिक तर सांघिकमध्ये तीन स्पर्धकांनी भाग घेतला. वैयक्तिक स्पर्धेत आर्या पोटेकर तर सांघिकमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला.

अध्यक्षपदी मयेकर

राजापूर : येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी महेश मयेकर तर उपाध्यक्षपदी विवेक गुरव आणि सचिवपदी राजू राणे, खजिनदार म्हणून प्रसाद नवरे यांची निवड करण्यात आली.

शिमगोत्सव साधेपणाने

आवाशी : खेड तालुक्यातील श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान, आंबये या ग्रामदेवतेचा शिमगोत्सव यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय देवस्थानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला आहे. सोमवार, २९ रोजी सकाळी ७ वाजता मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत होम लावला जाणार आहे.

एस. टी. सेवेला प्रारंभ

खेड : खेड आगाराची खेड तुळशी, विन्हेरे, महाड, पनवेल, ठाणे, नालासोपारामार्गे विरार अर्नाळा ही बससेवा बुधवारपासून सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन येथील आगारप्रमुखांकडून करण्यात आले आहे.

सर्वाधिक धान्य वाटप

रत्नागिरी : पॉस मशीनद्वारे रेशन दुकानावर धान्य वाटप करण्यात येत आहे. राजापूर तालुक्याने सर्वाधिक धान्य वाटप करुन प्रथम क्रमांक मिळवला आहे तर खेड तालुक्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. गेले १५ दिवस थांबलेले धान्य वाटप आता पूर्ववत सुरु झाले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जात आहे.

Web Title: S. T. Inconvenience due to closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.