कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमानुसार देण्यात यावे : सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:33 AM2021-08-27T04:33:53+5:302021-08-27T04:33:53+5:30

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील समस्या जाणून घेत असताना, कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या सफाई ...

Salary of contract employees should be paid as per rules: Samant | कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमानुसार देण्यात यावे : सामंत

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमानुसार देण्यात यावे : सामंत

googlenewsNext

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील समस्या जाणून घेत असताना, कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या सफाई कामगार, माळी, सुरक्षारक्षकांना देण्यात येणारे वेतन दैनंदिन वेतन व विशेष भत्ता मिळून नियमानुसार देण्यात यावे व तसेच त्यांचे एप्रिल २०२१ ते आतापर्यंतचे वेतनही त्यांना तत्काळ देण्यात यावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात शासकीय तंत्रनिकेतन येथे बैठक घेऊन कामकाजाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. यावेळी झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, दूरदृश्य प्रणालीद्वारे शासकीय तंत्रनिकेतनचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्राचार्य ए.एम. जाधव, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता वीणा पुजारी, शाखा अभियंता जनक धोत्रेकर, संचालक डॉ. अभय वाघ उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.

शासकीय इमारत, पदनिर्मितीअंतर्गत रस्ते, साधनसामुग्री खरेदी आदीसंदर्भात कार्यवाहिबाबतची माहिती घेतली. कंत्राटी सफाई कामगार, सुरक्षारक्षक, माळी यांच्या वेतनासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घ्यावा, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी सांगितले. ज्या ठेकेदाराने नियमापेक्षा कमी वेतनाची रक्कम कामगारांना दिली असल्यास त्याच्याकडून संबंधित रक्कम वसूल करून संबंधितांना देण्याबाबतची कार्यवाही करावी, अशी सूचना केली.

शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे भेट देऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र बांधकामाबाबतचा आढावा घेतला, तसेच त्यांनी अरिहंत मॉल येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, उपकेंदाच्या कामांचाही आढावा घेतला.

Web Title: Salary of contract employees should be paid as per rules: Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.