वेतन नियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:18+5:302021-06-21T04:21:18+5:30
रिजवाना शेख यांची निवड रत्नागिरी : काॅग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रिझवाना शेख यांची महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांसाठी ...
रिजवाना शेख यांची निवड
रत्नागिरी : काॅग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रिझवाना शेख यांची महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांसाठी यापुढेही चांगल्या पध्दतीने काम करत राहून महिला कॉग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संकल्प दिन साजरा
रत्नागिरी : कॉग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा कॉग्रेसतर्फे संकल्प दिन साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देण्यात आल्या.
बीएसएनएलचा बोजवारा
राजापूर : तालुक्यातील विल्ये, पडवे परिसरात भारत संचार निगम सेवेचा बोजवारा उडाला आहे. डोंगर, विल्ये-पडवे गावांमघ्ये अन्य कोणत्याही कंपनीची भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध नसल्याने भारत संचार निगमवर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे.
ग्रामीण वाहतूक सुरू
राजापूर : राजापूर आगारातून लांबपल्ल्यासह ग्रामीण भागातील काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे, तुळजापूर, सोलापूर, सावंतवाडी, बोरिवली, मुंबईसह ग्रामीण भागातील येरडव, पाचल, भवानी मंदिर, नाटे, जांभवली, आंबोळगडसह काही वस्तीच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
स्पेशल गाडीची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी नियमित गाड्यांचे आरक्षण जाहीर केले होते. काही वेळेतच आरक्षण फुल्ल झाले. अनेक गणेशभक्त वेटींगवर आहेत. त्यामुळे फेस्टिव्हल स्पेशल गाड्या गणेशोत्सवानिमित्त जाहीर कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
स्मृतिदिन साजरा
रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी येथील बाबाराम पर्शुराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात बाबाराम पर्शराम कदम यांचा पाचवा स्मृतिदिन प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले तर भूपाल शेंडगे यांनी आभार मानले. कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कोरोना चाचणी
रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांची कोरोना चाचणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, आदी उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
देवरूख : भारतीय जनता पक्ष प्रणित कोकण विकास आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कोकणचे प्रमुख संतोष शिंदे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अभिजित शिंदे, कोकण विकास आघाडीचे रत्नागिरी प्रमुख राजाराम मोरे उपस्थित होते.
ऑनलाईन स्पर्धा
खेड : भरणे बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा १४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होताना शाळेविषयी असणारे प्रेम व आदर दर्शविणारी शुभेच्छापत्रे रेखाटली होती.