हाफ मॅरेथाॅनद्वारे दिली ऑलिंपिक खेळाडूंना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:35 AM2021-08-28T04:35:11+5:302021-08-28T04:35:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी पदक प्राप्त करून भारताची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी पदक प्राप्त करून भारताची मान उंचावली. त्याचबरोबर इतर खेळाडूंनीसुद्धा चमकदार कामगिरी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या कामगिरीला मानवंदना म्हणून राजे स्पोर्ट्स ॲकॅडमी, दापोली यांचे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्याकडून आगरवायंगणी ते दापोली अशी सुमारे २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन तसेच ४२ किलोमीटर सायकलिंग करून एक अनोखी मानवंदना देण्यात आली.
राजे स्पोर्ट्स ॲकॅडमी, दापोलीचे प्रमुख प्रशिक्षक प्रा. संदेश सुनील चव्हाण उपप्रशिक्षक रोहन बैकर, रोशन पांदे, मयुर चांदीवडे, अक्षय गोंधळेकर, प्रणय वतारी, राजलक्ष्मी चव्हाण तसेच या ॲकॅडमीचे खेळाडू प्रणाली पवार, वेदांत पवार, सुजल पवार, शुभम मते, सुरज मते, निरंकार पागडे, आर्यन धोपट आणि पार्थ टेमकर यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी सायकलिंग करून पृथ्वी प्रदूषणमुक्त करून इंधनाची बचत करा व पर्यावरणाची हानी टाळा, त्याचबरोबर व्यायाम करून आरोग्य निरोगी ठेवून तंदुरुस्त बना, असा संदेशही दिला.
ॲकॅडमीचे अध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष माजी सैनिक रमेश जी. भैरमकर, दीपक निकम, खजिनदार सुदेश चव्हाण, अविनाश टेमकर, मयुर चांदीवडे, रोहन बैकर, प्रा. प्रथमेश दाभोळे, स्नेहा कदम आणि शिल्पा केंबळे यांचे सहकार्य लाभते. या कार्यक्रमाचा समारोप दापोलीमधील आझाद मैदानामधील ध्वजस्तंभाजवळ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष एकनाथ तारमळे, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश देवघरकर, बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष अविनाश लोखंडे, दापोली सायकल क्लबचे अमरीश गुरव, केतन पानवलकर, प्रदीप रजपूत उपस्थित होते. एस. एस. टी. महाविद्यालय, बदलापूर आणि मुंबई विद्यापीठाची लाँग डिस्टन्स रनर शिल्पा केंबळे हिनेसुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन मुलांना प्रोत्साहन दिले.