हातपाटी वाळू उपशाला लवकरच मुभा

By admin | Published: April 24, 2016 10:07 PM2016-04-24T22:07:11+5:302016-04-24T23:23:40+5:30

राधाकृष्णन बी. : देवरूखातील सप्तलिंगी नदीपात्र स्वच्छ करण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन

The sand belt of handcuffs will soon be completed | हातपाटी वाळू उपशाला लवकरच मुभा

हातपाटी वाळू उपशाला लवकरच मुभा

Next

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यात रॉयल्टीद्वारे हातपाटीने वाळू उपसा करण्याची मुभा दिली जाईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. नदीतील गाळ उपसा करण्यासाठी ग्रामस्थ मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी देवरूख येथील कार्यक्रमात बोलताना केले.
सोळजाई मंदिरामध्ये देवस्थानच्या पुढाकाराने पाणी हे जीवन हा उपक्रम हाती घेऊन सप्तलिंगी नदीचे ३ किमी पात्र स्वच्छ करण्याचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला. घाटमाथ्यावर कमी पाऊस पडतो, तरीही तेथे विहिरींचे पुनर्भरण उपक्रम राबवून त्या पाण्याचा मुबलकसाठा करून टंचाईवर मात केली जाते, असाच उपक्रम कोकणातील कातळ जमिनीमध्येसुध्दा राबविणे आवश्यक आहे, मार्गदर्शन करताना राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
हा उपक्रम राबवून देवस्थानने चांगला निर्णय घेतला आहे, अशाच प्रकारे जिल्ह्यातील गावागावात असलेली नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून मंडळांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजना लोकसहभागाच्याच आहेत. यातून अनेक फायदे होऊ शकतात, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. खाडीच्या मुखाशीही खाड्यांची पात्र गाळात रूतली आहेत. यासाठीही रॉयल्टी भरून हात पाटीद्वारे वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली जाईल, असेदेखील आश्वासन राधाकृष्णन बी यांनी दिले.
सोळजाई देवस्थानने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, भविष्यातील पाणीटंचाई दूर करणारा आहे. या चांगल्या उपक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी देवस्थानचे आभार मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी ही मनोगतातून पाणीटंचाईची भीषणता व त्यावरील उपाय नमूद केले. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनीही मनोगत व्यक्त करताना कोकणातील नद्यांची अवस्था व त्यांच्या सफाईची गरज व्यक्त करुन शासनाने याबाबत ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानने सुरू केलेल्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकसहभागातूनच विधायक व विकासाची कामे घडतात, हीच कास धरून सोळजाई देवस्थानने उचललेले पाऊल पाणीटंचाईवर मात करणारे आहे, असे सांगितले. या कार्यक्रमात देवस्थानचे अध्यक्ष शरदचंद्र गांधी यांनी या उपक्रमाची आवश्यकता व देवरूख नदीपात्राची दुरवस्था त्यातूनच जाणवणारी पाणीटंचाई याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या वेळी देवरूखचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, युवानेते रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बोथले, वेदा फडके, उपसभापती प्रमोद अधटराव, तहसीलदार वैशाली माने, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक भारती, कृषी अधिकारी हेमंत तांबे, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष शंकर शेट्ये सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, तालुका कृषी अधिकारी बी. जी. कदम, मुख्याधिकारी शिल्पा नाईक, मनोज जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष लाड यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The sand belt of handcuffs will soon be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.