संगमेश्वर, नावडी बाजारपेठ सोमवारी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:34+5:302021-06-26T04:22:34+5:30
देवरूख : संगमेश्वर तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ घालून नावडी बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्या, नाहीतर बाजारपेठ ...
देवरूख : संगमेश्वर तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ घालून नावडी बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्या, नाहीतर बाजारपेठ सुरू करणार अशा इशारा देण्यात आला हाेता़ त्यामुळे गुरुवारी दुकाने सुरू होतील अशी प्रतीक्षा हाेती़ मात्र, ग्राहकांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार. मात्र, सोमवारपासून ही दुकाने सुरू होतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
जिल्हाधिकारी यांनी संगमेश्वर तालुक्यातील पाच गावे कोरोनाबाधित घोषित केली. या गावातील लोकांच्या आरटीपीसीआर चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. या गावातील ९० टक्के लोकांच्या चाचण्या पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आल्या आहेत. पाच गावात कोराेनाबाधित क्षेत्र घोषित केल्यानंतर ग्रामस्थांनी विरोध केला होता़ तसेच संतप्त व्यापाऱ्यांनी निवेदन दिले होते़ मात्र, वारंवार निवेदन देऊनही काही होत नसल्याने व्यापारी आणि ग्रामस्थांनी तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराओ घातला आणि गुरुवारपासून दुकाने सुरू करीत असल्याचे सांगितले. मात्र, व्यापाऱ्यांनी यावर बैठक घेत पोलीस आणि आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने गुरुवारी दुकाने उघडली नाहीत. मात्र सोमवारपासून दुकाने सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे़