संजीव साळवी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:14+5:302021-07-07T04:38:14+5:30
रत्नागिरी : मॉडेलिंग फोटोग्राफीमध्ये नाव कमावणारे रत्नागिरीतील तरुण छायाचित्रकार संजय साळवी यांची आठवण म्हणून राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन ...
रत्नागिरी : मॉडेलिंग फोटोग्राफीमध्ये नाव कमावणारे रत्नागिरीतील तरुण छायाचित्रकार संजय साळवी यांची आठवण म्हणून राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. रत्नागिरीतील यूथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन संचलित वायफाय फोटोलव्हर्स आणि ९५ फॅमिली कलाकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
रत्नागिरीचे सुपुत्र संजीव साळवी हे महाराष्ट्र आणि गोव्यातील मॉडलिंग फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध होते. गेल्यावर्षी अचानक त्यांचे निधन झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांच्या ९५ कलाकार ग्रुपने संजीव साळवी यांची स्मृती कायम रहावी यासाठी यूथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने या फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली दोन वर्षे महाराष्ट्राभर अनेक नामवंत फोटोग्राफर संघटित करून वायफाय फोटोलव्हर्स ग्रुपमार्फत राज्यस्तरीय फोटोग्राफी अनेक विषयांवर सतत उपक्रम राबवले जातात.
संजीव साळवी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्यासाठी १३ जुलैपर्यंत मॉडेलिंग किंवा पोट्रेट फोटोग्राफी या विभागातील आपले छायाचित्र पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेचे पारितोषिके देण्यात देणार आहे.
स्पर्धेचा निकाल १४ जुलै २०२१ रोजी म्हणजे संजीव साळवी यांच्या स्मृतीदिनी जाहीर केला जाणार आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रा. शुभम पांचाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे संयोजन बिपीन बंदरकर, डॉ. आनंद आंबेकर आणि कुणाल संजीव साळवी करत आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.