खेडमध्ये संततधार; जगबुडीने ओलांडली इशारा पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:56+5:302021-07-14T04:36:56+5:30

खेड : तालुक्यात काेसळलेल्या पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या नारिंगी व जगबुडी नद्यांना पूर आला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ...

Santhadhar in Khed; The submarine crossed the warning level | खेडमध्ये संततधार; जगबुडीने ओलांडली इशारा पातळी

खेडमध्ये संततधार; जगबुडीने ओलांडली इशारा पातळी

Next

खेड : तालुक्यात काेसळलेल्या पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या नारिंगी व जगबुडी नद्यांना पूर आला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६ मीटरपर्यंत पोहोचली आहे. मात्र, बाजारपेठेत पुराचे पाणी आले नव्हते. पावसाचा जोर पुढील काही तास सुरू राहिल्यास बाजारपेठेत पुराचे पाणी घुसण्याचा धोका वर्तवला जात आहे, तर खेड-दापोली मार्गावर मोठा वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा वृक्ष हटवून वाहतूक पूर्ववत केली.

तालुक्यात १ जूनपासून एकूण १५९६.७० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट पाऊस आतापर्यंत झाला आहे. तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. ऐन लावणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने ५० टक्के लावणीची कामे अर्धवट राहिली होती; परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली असून, तालुक्यात शेतीच्या कामांसाठी वातावरण पोषक निर्माण झाले आहे. पावसाच्या रिमझिम ते मुसळधार सरी कोसळत असून, ग्रामीण भागासह शहरी भागात जनजीवनावर परिणाम जाणवत आहे.

तालुक्यातील नातूवाडी धरण क्षेत्रात १३७६ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण ७६.४९ टक्के भरले असून, १.९४४ क्यूबिक मीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

------------------------

शेतीच्या कामांना वेग

खेडमध्ये पावसाने संततधार सुरू केली असून, सह्याद्रीच्या रांगांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही दिवस पाऊस न पडल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पावसाच्या हजेरीने नांगरणी व अन्य कामांना शेतात सुरुवात केली आहे.

------------------------------

खेड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत.

Web Title: Santhadhar in Khed; The submarine crossed the warning level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.