सप्रे महाविद्यालय कोकणातील पहिले स्वायत्त महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:21 AM2019-04-04T11:21:00+5:302019-04-04T11:22:58+5:30
कोकणातील ४ जिल्ह्यामध्ये ‘स्वायत्त्त महाविद्यालय म्हणून दर्जा मिळवण्याचा पहिला मान देवरुख शिक्षण प्रसारक संस्थेच्या आठल्ये - सप्रे - पित्रे कला वणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाला मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत
देवरूख : कोकणातील ४ जिल्ह्यामध्ये ‘स्वायत्त्त महाविद्यालय म्हणून दर्जा मिळवण्याचा पहिला मान देवरुख शिक्षण प्रसारक संस्थेच्या आठल्ये - सप्रे - पित्रे कला वणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाला मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष मदन मोडक, नेहा जोशी, प्रा. पांडुरंग भिडे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर उपस्थित होते. ते म्हणाले की, आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयाला नॅकची अ श्रेणी मिळाली आणि याचवेळी आपण पुढचे ध्येय गाठण्याचा मनोदय निश्चित केला. याप्रमाणे केंद्राच्या बदलणाºया शैक्षणिक धोरणाचा विचार करून आपले महाविद्यालय स्वायत्त व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. यासंदर्भात संस्था संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून स्वायत्त महाविद्यालयाबाबतची भूमिका स्पष्ट केली. या भूमिकेबद्दल प्राध्यापकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळेच आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीचे परीक्षण स्वतंत्र एजन्सीमार्फत व यु. जी. सी. मार्फत करून घेतले. या यु. जी. सी.च्या उच्चाधिकार समितीने देवरूख महाविद्यालयात दाखल होऊन परीक्षण केले.
महाविद्यालयाची सक्षमता, आधुनिक पायाभूत सुविधा, प्रबंधनाची सशक्तता, महाविद्यालयाला मिळालेली नॅकची अ श्रेणी तसेच विद्यापीठाचा मिळालेला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार याबरोबरच महाराष्टÑ शासनाचे जाणीव जागरांचा अभियानांतर्गत मिळालेला पुरस्कार, पीएच. डी. सेंटरपर्यंत सुविधांचा विचारदेखील यावेळी करण्यात आला. तसेच विद्यावाचस्पती व अर्हताप्राप्त प्राध्यापकवर्ग या बाबींचा साकल्याने विचार करून स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जाची मान्यता देवरूख महाविद्यालयाला बहाल केल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्त मान्यतेमुळे आजुबाजूची महाविद्यालयेही हा मार्ग स्वीकारतील, असा आशावाद भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. नरेंद्र्र तेंडोलकर स्वायत्त महाविद्यालयाचे फायदे विषद करताना म्हणाले, स्वायत्तता ब्रॅन्ड असल्याचे सांगितले.
मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक समितीवर डॉ. व्यंकट रामण्णा, प्राचार्य डॉ. सिध्देश्वर गडदे, डॉ. अतुल साळुंखे यांची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालय उद्योग जगताशी तसेच अन्य विद्यापीठांशी सहकार्य करार करून नवनवीन अभ्यासक्रम राबवू शकते. देशभरातील सुमारे ४० हजार महाविद्यालयांमध्ये केवळ सुमारे ६५० महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील ८०० महाविद्यालयांपैकी आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालय स्वायत्तता मिळालेले २१वे महाविद्यालय असल्याचे त्यांनी नमूद केले.
या साºयावर लक्ष ठेवणाºया कमिटीमध्ये विविध क्षेत्रातील १६ तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. यामध्ये यु. जी. सी., विद्यापीठ, शिक्षण संचालक तसेच उद्योग क्षेत्र, मेडीसीन आदींचा समावेश आहे.