रत्नागिरीतील सराफ बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:11+5:302021-08-24T04:36:11+5:30

रत्नागिरी : ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयूआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक ...

Saraf Bazaar in Ratnagiri closed | रत्नागिरीतील सराफ बाजार बंद

रत्नागिरीतील सराफ बाजार बंद

googlenewsNext

रत्नागिरी : ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयूआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ रत्नागिरी सराफ संघटनेने राज्यव्यापी संपाला पाठिंबा दर्शवत सोमवारी लाक्षणिक संप केला. त्यामुळे आठवड्याचा पहिला दिवस असूनही बाजारपेठेतील सराफांच्या बंद दुकानासमोर सामसूम होती.

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला. देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागतदेखील केले. आतापर्यंत त्याची अंमलबजावणीसुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती. परंतु, बीआयएसने शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली. इतकेच नव्हे, तर ही आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले. या पद्धतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे आणि व्यापाऱ्यांनाही पेपरवर्क वाढल्याचा त्रास होणार आहे.

याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने साेमवार, ३ ऑगस्ट रोजी लाक्षणिक संपाची हाक दिली. त्याला पाठिंबा देत रत्नागिरी सराफ संघटनेनेदेखील या बंदमध्ये सामील होत एक दिवस दुकाने बंद ठेवली. त्यामुळे रत्नागिरी शहरातील राम आळी येथील सराफांच्या बंद दुकानांसमोर सामसूम दिसत होती.

Web Title: Saraf Bazaar in Ratnagiri closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.