थेट सरपंच निवडणुकीत सेना-राष्टÑवादीची टक्कर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:47 AM2017-08-03T00:47:17+5:302017-08-03T00:47:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीनंतर आॅक्टोबरमध्ये होणाºया २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील आपली राजकीय शक्ती आजमावण्याची संधी सर्वच पक्षांना उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीत सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने शिवसेना, राष्टÑवादी, भाजप व कॉँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वर्चस्व सिध्द करणाºया शिवसेनेला २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेस टक्कर देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने ५ पैकी ३ विधानसभा मतदारसंघात विजय संपादन केला होता, तर राष्टÑवादी काँग्रेसने २ विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण या तीन ठिकाणी सेनेचे आमदार निवडून आले. दापोली व गुहागर या दोन मतदारसंघात राष्टÑवादीने बाजी मारली. मात्र, त्यानंतर अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने मोठी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या ५५पैकी ३९ जागा सेनेने पटकावल्या व जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता स्थापन केली. राष्टÑवादीला १६ जागांवर विजय मिळाला. मात्र, अन्य पक्षांचा या निवडणुकीत पुरता सफाया झाला.
येत्या आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मात्र, यावेळी राज्य सरकारने नगराध्यक्षांप्रमाणेच गावचा सरपंचही थेट जनतेतून निवडून आणण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पक्षीय चिन्ह देण्यात आली होती. थेट सरपंच निवडणुकीसाठीही पक्षाची चिन्ह वापरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निवडून आले यापेक्षा थेट सरपंच निवडून आणण्यास अधिक महत्व येणार आहे. सरपंच निवडून आल्यास ग्रामपंचायतीची सत्ता संबंधित पक्षाच्या हाती येणार आहे. त्यामुळेच जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून येऊ शकेल, अशा लोकप्रिय उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांकडून घेतला जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात जागा मिळाल्या नाहीत तरीही आता भाजपकडील इनकमिंग सध्या जोरात वाढले आहे. पक्ष राज्यात सत्तेवर असल्याने जिल्ह्यात थेट सरपंच अधिक प्रमाणात निवडून आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जाण्याची शक्यता आहे. कॉँगे्रस अद्यापही कूल कुलच आहे.
निवडणूक : राजकीय शक्ती पणाला लागणार
निवडणुकीला मिनी विधानसभेचे स्वरुप येणार.
राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू.
जिल्ह्याच्या राजकारणावर सेना, राष्टÑवादीचे वर्चस्व.
थेट सरपंचपदासाठी पक्षांकडून लोकप्रिय उमेदवारांचा शोध.
आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या २३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जात आहेत. २०१९मध्ये विधानसभा निवडणुका जिल्ह्यात जिंकायच्या असतील तर येणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या रुपाने गावावर राजकीय वर्चस्व ठेवण्याची आवश्यकता आहे.