Satara Bus Accident : अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 08:04 PM2018-07-29T20:04:50+5:302018-07-29T20:05:26+5:30

आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. 

Satara Bus Accident: Maharashtra government to provide jobs to one dependent from each victim's family | Satara Bus Accident : अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

Satara Bus Accident : अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

Next

दापोली - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण ३० कर्मचारी या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. 

शासनाकडून जाहीर करण्यात आलेली ४ लाख रुपयांची मदत सोमवारी सायंकाळपर्यंत महसूल विभागाकडून दिली जाईल. राज्यातील व देशातील सगळ्या घाटांना बॅरिगेट्स लावणे आवश्यक आहे. याचीही दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, जिल्हाधिकारी प्रदीप पी., नियोजन समिती सदस्य नीलेश शेठ, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तहसीलदार कविता जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Satara Bus Accident: Maharashtra government to provide jobs to one dependent from each victim's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.