आठ प्रभागात सतरा नगरसेवक

By admin | Published: July 29, 2016 09:55 PM2016-07-29T21:55:55+5:302016-07-29T23:24:45+5:30

राजापूर नगर परिषद : प्रभागांमधील आरक्षणानंतर प्रभागांची रचना निश्चित

Satara corporator in eight divisions | आठ प्रभागात सतरा नगरसेवक

आठ प्रभागात सतरा नगरसेवक

Next

राजापूर : आगामी होणाऱ्या राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील आठ प्रभागांमधील आरक्षणानंतर आता या प्रभागांची रचना निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १ हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. हा प्रभाग उत्तरेकडे मौजे कोदवली गाव सीमेलगतची वहाळी, पूर्वेकडे गुरववाडी स्मशानभूमीलगतच्या वहाळीच्या बिंंदूपासून कोर्ट पाणंद आचार्य कुलकर्णी मार्गापर्यंत, दक्षिणेला वासूकाका जोशी पुलापासून कुलकर्णी मार्गाच्या पुढे परिट घाटीपासून मराठा बोर्डिंग व त्यापुढे नाभिक वठार ते कन्याशाळा वहाळीपर्यंत लंबू कब्रस्थान व पुढे स. न. ४६ पर्यंत, पश्चिमेला कोदवली गावच्या सीमेलगत वहाळीच्या नदीपासून वासूकाका जोशी पुलापर्यंतचा भाग असा आहे .प्रभाग क्रमांक २ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व सर्वसाधारण असा आहे. कोदवली गावसीमेची वहाळी गावच्या रस्त्यापासून मुंबई - गोवा महामार्गापर्यंत आगार व्यवस्थापक यांच्या निवासाच्या वहाळीपासून तालिमखाना रस्ता व पुढे शास्त्रीमार्गापासून पीरखान पायवाट व पुढे घरापर्यंत महापुरुष घुमटीलगतच्या वहाळीपासून जैतापूर खाडी परिसरासह नदीपात्राचा भाग मिरजकर घाटीपर्यंत, जैतापूर खाडीपासून वीर सावरकर मार्गाचा भाग मिरजकर घाटीपासून पुढे शास्त्री मार्गाचा भाग ते चर्मकार तिठ्यापासून पुढे बारगीर घाटीचे सुरुवातीपासून बौध्दवाडी तिठ्यापर्यंत खडबशा घाटीचा भाग सर्व्हे नं. ६६ पर्यंतची हद्द, आचार्य कुलकर्णी मार्ग ते कोर्ट पाणंद कोदवली गाव सीमेपर्यंतची हद्द.
प्रभाग क्रमांक ३ हा सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असा आहे. या प्रभागाची रचना शीळ गावची हद्द उत्तर-पूर्व. त्यापुढे जैतापूर खाडीचा भाग महापुरुष घुमटीपासून पुढे, आगार व्यवस्थापकांच्या निवासापासून तालिमखाना रस्त्यापर्यंत, मुंबई-गोवा मार्ग क्रमांक ६६ च्या पुढील भाग शास्त्रीमार्गापासून पीरखान पायवाटेपर्यंत व त्यापुढील भाग.
प्रभाग क्रमांक ४ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित आहे. हा प्रभाग तांबे पायवाटेपासून काझी फ्लोअर मील रस्तापर्यंत पुुढे अर्जुना नदीचा भाग कोंड्ये गावची सीमा, तेथून राष्ट्रीय महामार्गाचा भाग, डोंगर गावाकडे जाणारा रस्ता धोपटेवाडी, पुढे खाडीचा भाग पलिकडे बागकाझी मोहल्ला तांबे पायवाटेपर्यंत आहे.
प्रभाग क्रमांक ५ हा सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित असून, याची ११२४ लोकसंख्या आहे . हा प्रभाग शिवाजी पथापासून बोंबे टेलरची गल्ली पुढे भाऊ पाटणकर मार्ग, पाटणकर मार्गाचा भाग, पुढे बंदर धक्का, बौध्दवाडी रस्त्याचा भाग वाघूघाटीपासून चर्मकार तिठा, मिरजकर घाटी व पुढे वीर सावरकर मार्गापर्यंत बंदर धक्क्यापासून शिवाजी पथ ते जैतापूर खाडीचा भाग व पुढे मिरजकर घाटीचे बिंंदूपर्यंत बोंबे टेलर गल्ली शिवाजी पथापासून गोडे नदीपात्र बंदर धक्का असा आहे.
प्रभाग क्रमांक ६ हा सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री असा आहे. यामध्ये वासूकाका जोशी पुलाचा भाग पुढे कुलकर्णी मार्गाचा भाग ते परिट घाटी मराठा बोर्डिंगपासून नाभिक वठार, कन्याशाळा वहाळीपासून लंबू कब्रस्तान, वाघूघाटीपासून बंदरकर घरापर्यंत, खडबडशा मार्ग तालिमखानापर्यंत, बोंबे टेलर गल्लीपासून वाघू घाटी ते वासूकाका जोशी पूल, गोडेनदीचा भाग, जवाहर चौक बोंबे टेलर गल्ली ते शिवाजी पथाचा भाग आहे.
प्रभाग क्रमांक ७ हा सर्वसाधारण स्त्री व नागरिकांचा मागास प्रवर्ग असा आहे. याची लोकसंख्या ११९८ एवढी आहे. यामध्ये मौजे तिथवली व हर्डी गावची हद्द, गोडे नदीपात्राचा भाग, धोपेश्वर गावची हद्द, बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचा भाग ते साखळकरवाडी तिठ्यापर्यंत व पुढील वहाळीपर्यंत पश्चिमेस धोपेश्वर, तिथवली व हर्डी गावची हद्द.
प्रभाग क्रमांक ८ हा प्रभाग सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असा आहे. उत्तरेला धोपेश्वरची हद्द बाबासाहेब आंबेडकर रस्त्यापासून साखळकरवाडी तिठ्यालगतची वहाळी, वहाळापासून गोडे नदीपात्राचा भाग व पुढे जैतापूर खाडी, आझाद फ्लोअर मिल, आरेकर रस्त्यापासून तांबे पायवाट व दक्षिणेस जैतापूर खाडीपासून काही भाग पुढे धोपेश्वर सीमा व पश्चिमेस मौजे धोपेश्वर गावची सीमा अशी रचना आहे. (प्रतिनिधी)


नव्याने प्रभाग रचना : निवडणुकीच्या घोषणेची पक्षांना उत्सुकता
नव्याने ही प्रभाग रचना करण्यात आली असून, प्रत्येक राजकीय पक्षाने आरक्षण नजरेपुढे ठेवून आपापले उमेदवार शोधायला सुरुवात केली आहे. आता सर्व पक्षांना निवडणुकीची घोषणा केव्हा होते, त्याचे वेध लागले आहेत.
शहरातील एकूण आठ प्रभागांमधून सतरा नगरसेवक निवडून द्यायचे असून, पहिल्या सात प्रभागांमधून प्रत्येकी दोन तर एका प्रभागातून तीन सदस्यांची निवड करावयाची आहे. प्रभाग आठमधूनच तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत.

Web Title: Satara corporator in eight divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.