सातबारा मिळणार घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:34 AM2021-09-05T04:34:52+5:302021-09-05T04:34:52+5:30

रत्नागिरी : येत्या २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून नवीन सातबाराचे रूप शेतकऱ्यांना समजण्यासाठी संगणकीकृत सातबाराची पहिली प्रत खातेदारांना ...

Satbara will get home delivery | सातबारा मिळणार घरपोच

सातबारा मिळणार घरपोच

Next

रत्नागिरी : येत्या २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून नवीन सातबाराचे रूप शेतकऱ्यांना समजण्यासाठी संगणकीकृत सातबाराची पहिली प्रत खातेदारांना घरपोच दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरण प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहेत.

वीजपुरवठा खंडित करू नका

गुहागर : थकीत झालेल्या वीज बिलामुळे ग्राहकांचा वीजपुरवठा गणेशोत्सव काळात बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आसिफ दळवी यांनी केली. तालुक्यात महावितरणची घरगुती थकबाकी कधीही वाढली नव्हती, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपले वीजबिल भरता आलेले नाही. गौरी-गणपती सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नये.

रोप स्किपिंगमध्ये स्वरा दुसरी

रत्नागिरी : जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत स्वरा साखळकर हिने दुसरा क्रमांक पटकावला. अवघ्या ९ वर्षांच्या स्वराने एका मिनिटात १४८ रोप स्किपिंग पूर्ण करून हे यश संपादन केले. यापूर्वी तिने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ३ सुवर्ण व १ कांस्य पदक पटकावले आहे. स्वरा ल.ग.प. पटवर्धन शाळेत तिसरीमध्ये शिकत आहे.

विविध कार्यक्रम

रत्नागिरी : प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे ‘जागतिक नारळ दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी शेतकरी मार्गदर्शन, प्रात्यक्षिके व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय सावंत, संशोधन संचालक डाॅ. पराग हळदणकर यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन. पाटील, नारळ विकास बोर्डाचे माजी सदस्य राजाभाऊ लिमये, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते.

अध्यक्षपदी प्राजक्ता गोताड

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी पन्हळीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्राजक्ता गोताड यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी श्रेया महाकाळ, आरोग्य प्रतिनिधी सुजाता खापले, शिक्षण प्रतिनिधी उदय महाकाळ, प्रतीक्षा ठीक व शिल्पा खापले यांची एकमताने निवड झाली. राजन चौगुले यांनी आभार मानले.

दुरुस्तीबाबत निवेदन

दस्तुरी : खेड तालुक्यातील कोकण महासंघाचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी गणपतीपूर्वी ताम्हिणी घाटाची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. महाड, खेड, दापोली, मंडणगड आदी ठिकाणी पुण्याहून येण्यासाठी ताम्हिणी रस्ता उपयोगी ठरत असून, या रस्त्याची सद्य:स्थितीत दुरवस्था झाली आहे.

Web Title: Satbara will get home delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.