सॅटेलाईट टॅगिंग केलेले ‘वनश्री’ कासव संपर्कात, सहा महिन्यापूर्वी सोडले होते समुद्रात

By अरुण आडिवरेकर | Published: August 23, 2022 06:32 PM2022-08-23T18:32:11+5:302022-08-23T18:35:33+5:30

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग करुन कासवांना समुद्रात साेडण्यात आले

Satellite tagged Vanashree turtles in contact, released into the sea six months ago | सॅटेलाईट टॅगिंग केलेले ‘वनश्री’ कासव संपर्कात, सहा महिन्यापूर्वी सोडले होते समुद्रात

सॅटेलाईट टॅगिंग केलेले ‘वनश्री’ कासव संपर्कात, सहा महिन्यापूर्वी सोडले होते समुद्रात

googlenewsNext

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सहा महिन्यापूर्वी सॅटेलाइट टॅगिंग करुन पाच कासवांना समुद्रात साेडण्यात आले हाेते. या पाच कासवांपैकी ‘वनश्री’ हे एकमेव कासव संपर्कात असून, अन्य चार कासव संपर्काबाहेर गेली आहेत. काही दिवसांपूर्वी संपर्क तुटलेले ‘रेवा’ हे चौथे कासव ठरले.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासव अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, ती कोठून येतात. याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग केलेली पाच कासवे समुद्रात सोडण्यात आली. त्यातील ‘लक्ष्मी’, ‘प्रथमा’, ‘रेवा’, ‘सावनी’ या चार कासवांचा विशिष्ठ अंतर प्रवास केल्यानंतर संपर्क तुटला.

त्यानंतर ‘वनश्री’ एकमेव ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपर्कात होती. ते मालवण किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात डुबकी घेत होते. ६ ऑगस्टला वनश्रीकडून सिग्नल मिळणे बंद झाले. ट्रान्समीटर निकामी झाल्यामुळे किंवा बॅटरी संपल्यामुळे संपर्क तुटल्याचा अंदाज अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे. ‘वनश्री’ कासव १५ फेब्रुवारी २०२२ रोजी गुहागर येथून टॅग लावून सोडण्यात आले हाेते. हे कासव गोव्याच्या किनाऱ्यापासून १०० किलोमीटर अंतरावर कॉन्टिनेंटल शेल्फच्या काठावर होती. पाचपैकी ‘वनश्री’ कासवाचा प्रवास कोकण आणि गोवा किनारपट्टीच्या दरम्यान होता. त्या पलीकडे कुठेच ‘वनश्री’चा प्रवास झालेला नाही.

दरम्यान, ‘प्रथमा’ कासव गुजरातला जाऊन माघारी परतले. यावरुन ती अतिखोल समुद्रात जात नसून खंडीय भागातच राहत असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे.

Web Title: Satellite tagged Vanashree turtles in contact, released into the sea six months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.