कुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 05:55 PM2019-06-15T17:55:34+5:302019-06-15T17:57:17+5:30

गुहागर तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

School closes on the first day of Kudali school? | कुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?

कुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?

Next
ठळक मुद्देकुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?शिक्षक नसल्याने घेतला निर्णय: विद्यार्थी शाळेत न पाठविण्यावर पालक ठाम

गुहागर : तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

गुहागर तालुक्यातील कुडली गावातील शाळा नं.१ ही शाळा स्थापनेपासून उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात प्रिसध्द आहे. या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज राज्यभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. आदर्श शाळा पुरस्कार मिवविणार्या १ ते ७ पर्यंत असणाऱ्या या शाळेमध्ये आजच्याघडीला १२५ विद्यार्थी आहेत.

या शाळेच्या पटावर शिक्षक संख्या ६ आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे चारच शिक्षक कार्यरत आहेत. १ आॅगस्ट २०११ रोजी पदवीधर शिक्षक म्हणून हजर झालेले कारेकर यांच्या अध्यापनाच्या संदर्भात वारंवार असणाऱ्या मुलांच्या, पालकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या तक्रारीनुसार २५ जुलै २०१६ रोजी त्यांना भातगाव कोसबी शाळेवर प्रकरणी कामगिरीवर काढण्यात आले .

२८ डिसेंबर २०१६ रोजी खेड तालुक्यातून प्रकरणी बदली होऊन मुख्याध्यापक म्हणून हजर झालेले नलावडे यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे व अध्यापनातील त्रुटींमुळे तक्रारींवरुन त्यांनासुध्दा १९ जून २०१८ रोजी पाचेरीआगर नंबर ३ शाळेवर पुन्हा प्रकरणी कामगिरीवर पाठविण्यात आले. यामुळे पटावर जरी शिक्षक ६ दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र, चारच शिक्षक कार्यरत आहेत.

या संदर्भात मागील १ वर्षभर शिक्षक मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, याबाबत तालुका शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या अपुऱ्या शिक्षकांमुळे शाळेतील १२५ मुलांचे भवितव्य अंधारमय होत असल्याने व्यवस्थापन समिती व पालकांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या प्ररंभीच शिक्षकांची व्यवस्था न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे लेखी निवेदन गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती, गुहागर यांना देण्यात आले असून ते आता कोणता निर्णय घेतात याकडे ग्रमस्थांचे लक्ष लागून आहे.

Web Title: School closes on the first day of Kudali school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.