रत्नागिरी तालुक्यात शाळांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:59+5:302021-05-19T04:32:59+5:30
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळा व १४ माध्यमिक शाळांना फटका बसला आहे. प्राथमिक ...
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ प्राथमिक शाळा व १४ माध्यमिक शाळांना फटका बसला आहे. प्राथमिक शाळांचे १० लाखांचे, तर माध्यमिक शाळांचे १२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लायन्सतर्फे कोविड सेंटरला साहित्य वाटप
रत्नागिरी : जागतिक परिचारिका दिनानिमित्त लायन्स क्लब न्यू रत्नागिरीचे अध्यक्ष गिरीश तोरस्कर व सदस्यांनी परिचारिकांचा सन्मान केला. तसेच कुवारबाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोविड विलगीकरण कक्षाला उपयुक्त साहित्य वितरित केले.
गणपतीपुळेत पडझड, बागांचे नुकसान
गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी पडझड झाली असून, आंबा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी महामार्गावर अनेक ठिकाणी झाडे जमिनदोस्त झाली.
पोलिसांच्या कार्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
रत्नागिरी : तौक्ते वादळामुळे मोडून पडलेली झाडे रत्नागिरी पोलिसांकडून कशाप्रकारे हटविली जात आहेत, याचे छायाचित्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून टिवटर या समाज माध्यमावर टाकण्यात आले होते. पोलिसांकडून चांगले काम होत असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही रत्नागिरी पोलिसांना मिळालेली पोचपावती मानली जात आहे.