शालेय पोषण आहाराचा माल कालबाह्य का...
By admin | Published: March 2, 2015 10:10 PM2015-03-02T22:10:00+5:302015-03-03T00:34:15+5:30
ऐरणीवरचा प्रश्न : पोषण आहाराबाबत सतर्क असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या मालाच्या पॅकिंगवर उत्पादनाची व कालमर्यादेची तारीख नमूद करण्यात येत नसल्याने कालबाह्य मालाचा पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या धान्याचा यापूर्वी अनेकदा पुरवठा करण्यात आल्याचे समोर येऊनही त्यात बदल झालेला नाही.
गरीब असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळत नाही. विद्यार्थ्यांना दुपारचे सकस अन्न मिळावे, यासाठी शासनाने माध्यान्ह शालेय पोषण आहार सुरु केला. त्यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांना दर्जेदार धान्य देण्यात येत होते. त्यामध्ये घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने आता विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्यात येते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी दुपारचे जेवण शाळेतच करतात. शालेय पोषण आहाराच्या मालाचा ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वेळेवर पुरवठा होत नसल्याची ओरड सुरु होती. शालेय पोषण आहाराबाबत मध्यंतरी अनेक तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, त्याकडे पुरवठादाराकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचीही ओरड सुरु आहे.दोन महिन्यांपूर्वी पुरवठादाराकडून काही प्राथमिक शाळांना तुरडाळ पुरवठा करण्यात आली होती. ती तुरडाळ शिजत नव्हती. ती डाळ आदल्या दिवशी पाण्यात भिजत घालावी लागत होती. त्यामुळे तुरडाळीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कीड लागलेले कडधान्य व हरभऱ्याचा पुरवठा करण्यात आला होता. शिक्षण समितीच्या सभेत तुरडाळ खराब असल्याचा आरोप करण्यात आला होता. पोषण आहाराबाबत नेहमीच ओरड करण्यात असते. या आहारासाठी पुरवठा करण्यात येणारा माल कालबाह्य असल्याची ओरड सुरु आहे. या मालावर मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट असणे आवश्यक आहे. मात्र, पोषण आहाराच्या मालांच्या पाकिटावर या दोन्ही तारखांची कोठेही नोंद केलेली नसते. ही नोंद नसल्याने सदर माल निकृष्ट दर्जाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारचा मालाचा वापर करणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकते, याची दखल संबंधित यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे. (शहर वार्ताहर)
$$्निरत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या मालाच्या पॅकिंगवर मुदत नमूद करण्यात येत नसल्याने हा पोषण आहार कालबाह्य झाला असल्याची शक्यता अनेक भागातून व्यक्त केली. दुपारचे अन्न सकस मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असताना अशा प्रकाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे.