जिल्ह्यातील ९७३ गावांतील शाळा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:45+5:302021-07-07T04:39:45+5:30

रत्नागिरी : गेले दीड वर्ष कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन अध्यापनासाठी ...

Schools to be started in 973 villages of the district? | जिल्ह्यातील ९७३ गावांतील शाळा सुरू होणार?

जिल्ह्यातील ९७३ गावांतील शाळा सुरू होणार?

Next

रत्नागिरी : गेले दीड वर्ष कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली. मात्र, कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करता येऊ शकतात, या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एकूण १५३४ गावांपैकी ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावात शाळा सुरू करणे शक्य आहे. मात्र शासनाने पुन्हा या निर्णयात बदल करण्याचे निश्चित केल्याने सुधारित निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे ऑनलाइन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दि. १४ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाइन अध्यापन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५३४ गावांपैकी ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासन निर्णयानुसार संबंधित गावांतील शाळा सुरू होऊ शकतात. शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी त्यामध्ये काही बदल करून सुधारित आदेश जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने नव्या आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असली तरी जिल्ह्यातील १५३४ गावांपैकी ६५ गावे सुरुवातीला कोरोना वेशीवरच रोखण्यात यशस्वी झाली होती. जिल्ह्यातील एकूण ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावातून कोरोना हद्दपार झाल्याने गावे व ग्रामस्थ सुरक्षित आहेत. शासकीय नियमावलींचे पालन करून या गावांतील शाळा प्रत्यक्ष सुरू होऊ शकतात.

जिल्ह्यातील एकूण गावे १५३४

कोरोनामुक्त गावे ९७३

जिल्ह्यातील एकूण शाळा ३२०२

जिल्हा परिषदेच्या शाळा २५७४

अनुदानित शाळा ३६६

विनाअनुदानित शाळा २३४

Web Title: Schools to be started in 973 villages of the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.