एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:12 PM2019-10-31T18:12:57+5:302019-10-31T18:14:34+5:30
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी विंचूदंश नेमका कसा काय झाला, याची माहिती घेता शेतकऱ्यांनी कातळावर कापून ठेवलेले भात उचलताना विंचूदंश झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन वर्षात जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १६७१ जणांना विंचूदंश झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
भिजलेल्या भाताच्या पेंढ्या सुकविण्यासाठी कातळावर पसरविण्यात आल्या होत्या. पेंढ्या अधिक काळ एकाच जागेवर राहिल्याने त्याखाली विंचवांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले आहे.