दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:08+5:302021-06-10T04:22:08+5:30
२. रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील कोरोना चाचणी अहवाल देण्यास विलंब करणाऱ्या मायलॅब कंपनीचे काम प्रशासनाने थांबविले आहे. जिल्हा ...
२. रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील कोरोना चाचणी अहवाल देण्यास विलंब करणाऱ्या मायलॅब कंपनीचे काम प्रशासनाने थांबविले आहे. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. शासनाने त्याऐवजी दुसऱ्या कंपनीची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तो रोखण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दिवसाला तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये ५०० ते ६०० कोरोनाबाधित सापडत आहेत.
३. रत्नागिरी : कोरोनाने वाडी-वस्तीवर हातपाय पसरले असून, रत्नागिरी तालुक्यात परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आरोग्य विभागाने सरसकट चाचणीसाठी मोबाईल पथकांचा प्रयोग सुरू केला आहे. स्वत:हून ग्रामस्थ चाचणीसाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाला आहे. चारपेक्षा अधिक रुग्ण सापडणाऱ्या वाडीतील सरसकट चाचण्यांसाठी ग्राम कृती दलाचे सहकार्य घेण्यास प्रारंभ केला आहे.