लसीची दुसरी मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:45+5:302021-06-19T04:21:45+5:30
२. गतवर्षी कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात यायला न मिळाल्याने चाकरमान्यांनी यंदा आतापासूनच गावी येण्याची तयारी सुरू ...
२. गतवर्षी कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात यायला न मिळाल्याने चाकरमान्यांनी यंदा आतापासूनच गावी येण्याची तयारी सुरू केली आहे. शिमगोत्सवासाठी अनेक चाकरमानी मुंबई, पुणे येथून आले होते. या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने गणेशोत्सवाला चाकरमानी येणार असल्याने त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
३. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे तसेच मृतांची संख्याही जास्त आहे. महिनाभर लॉकडाऊन करूनही कोरोनाची संख्या कमी झालेली नाही. त्यातच कोरोना चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहेत. त्यातच कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर कमी झालेला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कोरोनाची संख्या आणि मृतांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्हीटी दर कसा कमी झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.