महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची दुसरी साहित्य सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:30 AM2021-03-18T04:30:54+5:302021-03-18T04:30:54+5:30

फोटो मजकूर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या रत्नागिरी शाखेची दुसरी साहित्य सभा रविवारी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात आयोजित केली ...

Second Sahitya Sabha of Ratnagiri branch of Maharashtra Sahitya Parishad | महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची दुसरी साहित्य सभा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची दुसरी साहित्य सभा

Next

फोटो मजकूर

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या रत्नागिरी शाखेची दुसरी साहित्य सभा रविवारी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात आयोजित केली होती. सभेची सुरुवात निरंजन गोडबोले यांच्या हार्मोनियम वादनाने झाली. निखिल रानडे यांनी तबला साथ केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या रत्नागिरी शाखेची दुसरी साहित्य सभा रविवारी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

सभेची सुरुवात रत्नागिरीतील प्रथितयश वादक निरंजन गोडबोले यांच्या हार्मोनियम वादनाने झाली. त्यांना निखिल रानडे यांनी उत्तम तबला साथ केली. त्यानंतर रत्नागिरीतील सिद्धहस्त लेखक दीपक नागवेकर यांनी त्यांच्या सोनतळ या ललित लेख संग्रहातील दोन लेखांचे वाचन केले. रसिकांनी त्यांना मनापासून दाद दिली. सभेच्या शेवटी ओंकार मुळ्ये यांनी ‘वपुं’चे लेखन या विषयी त्यांच्या निवडक कथांचा आधार घेत विचार मांडले.

या सभेला सुमारे ४० साहित्यप्रेमी उपस्थित होते. रत्नागिरीतील स्थानिक लेखक व साहित्यप्रेमी यांना आपले विचार मांडण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रत्नागिरीतर्फे दर महिन्याला अशा साहित्य सभेचे आयोजन करण्याचा मानस आहे. लेखक, कवी तसेच साहित्यप्रेमींनी या कार्यक्रामात सहभागी होण्यासाठी मनाली नाईक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सुभाष देव यांनी केले आहे.

Web Title: Second Sahitya Sabha of Ratnagiri branch of Maharashtra Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.