बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:27+5:302021-06-16T04:41:27+5:30

लांजा : युवा सेना व दी प्राईड इंडिया संस्थेतर्फे गरजू ५० कुटुंबांना धान्य किट, भात, नाचणी व हळद ...

Seed distribution | बियाणे वाटप

बियाणे वाटप

Next

लांजा : युवा सेना व दी प्राईड इंडिया संस्थेतर्फे गरजू ५० कुटुंबांना धान्य किट, भात, नाचणी व हळद पिकांच्या बियाण्यांचे तसेच खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, आदी उपस्थित होते.

ज्येष्ठांचे लसीकरण

दापोली : तालुक्यातील माटवण नवानगर येथील आरोग्य उपकेंद्रांतर्गत ग्रामस्थांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. २०० डोस ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. तालुका आरोग्याधिकारी डॉ. आशिष मार्कंड, राजेश महाडिक यांनी नियोजन केले होते.

रस्त्यात खड्डे

रत्नागिरी : शहरातील टिळक आळी येथे लोकमान्य टिळक स्मारकासमोर नव्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने खड्डे पडले असून, ठेकेदाराकडून कामामध्ये दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मास्क वाटप

रत्नागिरी : रिलायन्स फाउंडेशनतर्फे राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या वाहक व अन्य कर्मचाऱ्यांसाठी साडेतीन हजार मास्कचे वितरण करण्यात आले. विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांच्याकडे संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व चिन्मय साळवी यांनी मास्क वितरित केले.

भजन स्पर्धा

रत्नागिरी : सागरी सीमा मंच कोकण प्रांत आयोजित, आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ यांच्या सहयोगाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोकण विभागीय ऑनलाईन भजनरत्नांची मांदियाळी, भजनसम्राटांसाठी गुरुपुष्पांजली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विभागासाठी स्पर्धा होणार असून ऑनलाईन नियोजन केले आहे.

चिखलाचे साम्राज्य

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील लवेल-दाभिळ फाटा मार्गावर मुसळधार पावसाने माती आल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे चिखल तयार झाला आहे. अर्धा किलोमीटरपर्यंत चिखल साचला असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

फेस शिल्डचे वाटप

खेड : तालुका व शहर युवती सेनेतर्फे पोस्टमनना मास्क, सॅनिटायझर व फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी युवती सेना तालुकाप्रमुख सिद्धी शिंदे, उपतालुकाप्रमुख सुप्रिया कदम, उपशहरप्रमुख सई चिखले, प्रणिता भुवड, दीपिक्षा गुजर, आदी उपस्थित होते. पोस्टमनना घरोघरी पत्रवाटप करण्यासाठी जावे लागत असल्याने कोरोनापासून रक्षण करण्यासाठी साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: Seed distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.