बियाण्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:42+5:302021-06-22T04:21:42+5:30
लांजा : लांजा तालुका कृषी विभागातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांना भात, नाचणी, तूर व हळद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागातर्फे ...
लांजा : लांजा तालुका कृषी विभागातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांना भात, नाचणी, तूर व हळद बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागातर्फे ‘रत्नागिरी ६’ या वाणाचे १ हजार किलो व ‘रत्नागिरी ८’ या वाणाचे ७५० किलो बियाणे वाटण्यात आले. फुले नाचणी या वाणाच्या २७५ किलो बियाण्याचे वाटप करण्यात आले.
छात्र संवाद उपक्रम
देवरूख : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरातील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयात छात्र संवाद हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या वापरात नसलेल्या सुविधांची फी परत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धरणे भरली
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील अनेक धरणे गेल्या आठवड्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे तुडुंब भरली आहेत. त्याचबरोबर आता विहिरी काही ठिकाणी भरल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी तालुक्यात काही ठिकाणी असलेली पाणीटंचाई आता संपुष्टात आली आहे. सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.
धबधब्यांकडे पर्यटक आकर्षित
रत्नागिरी : सध्या लाॅकडाऊन असल्याने सार्वजनिक ठिकाणी जाण्यास जिल्हा प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. तरीही सध्या धबधबे कोसळू लागल्याने पर्यटकांची याठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने नागरिकांमधून कारवाईची मागणी होत आहे.