चिपळूण लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:15+5:302021-05-18T04:32:15+5:30

अडरे : लायन्स कल्बची सन २०२१-२२ च्या चिपळूण कार्यकारिणीची ॲानलाईन सभा घेण्यात आली. या सभेत लायन्स क्लबची ...

Selection of Chiplun Lions Club office bearers | चिपळूण लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड

चिपळूण लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड

Next

अडरे : लायन्स कल्बची सन २०२१-२२ च्या चिपळूण कार्यकारिणीची ॲानलाईन सभा घेण्यात आली. या सभेत लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी तुषार गोखले, सचिव जगदीश वाघुळदे व खजिनदार नहुष चितळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावेळी लायन्स अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, सचिव जगदीश वाघुळदे, खजिनदार दिनेश धारिया, तसेच निवड समितीचे प्रमुख विजय रतावा, भरत रेडीज, रमेश रेळेकर, रिजन चेअरमन नितीन गांधी, रिजन सचिव अरुण कदम व इतर लायन्स उपस्थित होते. या सभेत सर्वानुमते अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ जुलै २०२१ मध्ये होणार आहे.

Web Title: Selection of Chiplun Lions Club office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.